Ad will apear here
Next
रहस्यमय त्रिकोणाचा मागोवा
जगामध्ये काही रहस्यं अशी आहेत, की त्यांची उकल होत नाही. विज्ञानालाही त्यांचं कोडं सोडवता आलं नाही. सागरामध्ये असाच एक प्रदेश आहे, त्याचं नाव बर्म्युडा ट्रँगल. ह्या भागामध्ये अनेक विमानं, जहाजं त्यातल्या एक हजारपेक्षा जास्त प्रवाशांसह गायब झाली आहेत. ह्या विमानांचे अवशेष मागे सापडले नाहीत, मृत प्रवाशांचे देहही सापडले नाहीत. गायब विमान किंवा जहाजांचा शोध घेणाऱ्या मोहिमा आखल्या गेल्या. शेकडो मैल सागर पिंजून काढला गेला; पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही.

अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस असलेला हा सागरी प्रदेश अनेक वर्षांपासून एक गूढ बनून राहिला आहे. विजय देवधरांनी अनुवाद केलेल्या बर्म्युडा ट्रँगल पुस्तकात ह्या गूढ सागराचा वेध घेतला आहे. हा भाग सैतानाचा आहे इथपासून ते परग्रहावरील मानव इथून विमाने-जहाजे पळवतात इथपर्यंतच्या शक्यतांची माहिती दिली आहे. पुस्तकाचा मूळ लेखक चार्ल्स बार्लीज असून, देवधरांनी अत्यंत सोप्या मराठी भाषेत अनुवाद केला आहे.

हे पुस्तक वाचताना आपणही एका रहस्यमय जगात प्रवेश करतो. काही जहाजांवरील फक्त खलाशी गायब झाले, ते जहाज लुटण्याचा प्रयत्न झाला नाही, जहाजावरील माल तसाच होता. हे वाचून आपण बुचकळ्यात पडतो. पृथ्वीवरील मानवाचं संशोधन करायला खरंच परग्रहावरून कोणी आलं असावं असं वाटू लागतं. उडत्या तबकड्यांची माहिती मिळाल्यावर हा संशय आणखी गडद होतो. तसंच, देवधरांनी इजिप्तच्या पिरॅमिड्सचीही चर्चा केल्यामुळे अनेक रहस्यं पाहून आपण थक्क होतो. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्यावरील काही गूढ स्थळांची माहिती घेण्यासाठी हे पुस्तक एकदा वाचलंच पाहिजे.

- निरेन आपटे
.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YVAICU
Similar Posts
लंडनच्या आजीबाई ‘बेळगाव, निपाणी, कारवार आणि लंडनसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालाच पाहिजे अशी घोषणा आता द्यायला हरकत नाही,’ असे आचार्य अत्रे ह्यांनी एकदा गमतीने म्हटले होते.
मानसिक आजार जाणून घेण्यासाठी... मनाचे असे कोणते आजार असू शकतात आणि त्यावर काय उपाय केले जातात, ह्यावर डॉक्टर श्रीकांत जोशी ह्यांनी लिहिलेलं ‘मनोविकारांचा मागोवा’ हे पुस्तक म्हणूनच संग्रही ठेवण्यासारखं आहे.
डबिंगच्या गमतीजमती आमची रिहर्सल चालली होती; पण अमिताभ ‘च’चा उच्चार हिंदी ‘च’सारखा करत होते. मग मी मराठी ‘च’ म्हणून दाखवत होतो आणि ते फॉलो करत होते. शेवटी अचानक थांबले आणि त्यांनी मला विचारलं, ‘‘लोणचं’वाला ‘च’ बोलना हैं क्या?’ मी स्तंभित झालो. त्यांना लोणचं शब्द माहीत होता!! मी होकार दिल्यावर त्यांनी मराठी ‘च’चा अचूक
शेवटचे स्टेशन कुडाळ!! आपण लोकल ट्रेनने प्रवास करतो तेव्हा अनेक स्टेशनांची अनाउन्समेंट ऐकू येते आणि शेवटी आपले स्टेशन येते. अनेक स्टेशन्स पालथी घातल्यावर आपले मुक्कामी स्टेशन येते. इथे विसावा असतो. कल्याण सोडून असा विसावा कुडाळमध्ये घ्यावा असे मला वारंवार वाटत आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language